vivo x200 fe price: मित्रांनो, आयफोनला टक्कर देण्यासाठी Vivo भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला नवीन कॉम्पॅक्ट 5G फोन – Vivo X200 FE – लवकरच लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 256GB इंटरनल स्टोरेज आणि दमदार 6500mAh बॅटरी देण्यात येणार आहे. डिझाइनपासून ते परफॉर्मन्सपर्यंत, हा फोन थेट iPhone आणि Samsung सारख्या प्रीमियम ब्रँड्सना स्पर्धा देण्यास ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या फोनची चर्चा जोरात सुरू आहे. कारण कंपनीने अधिकृतपणे याच्या लॉन्च डेटची घोषणा केली असून, येत्या आठवड्यात Vivo आपले दोन दमदार स्मार्टफोन्स – Vivo X Fold 5 आणि Vivo X200 FE – भारतीय बाजारात सादर करणार आहे. या लेखात आपण खास Vivo X200 FE या आगामी स्मार्टफोनच्या प्राईस स्पेसिफिकेशन आणि लॉन्च डेट बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर चला, सुरुवात करूया!
Vivo X200 FE भारतात कधी होणार लॉन्च?
Vivo X200 FE स्मार्टफोनच्या लॉन्च डेटबद्दल कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल ‘X’ वर पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितले आहे की हा फोन 14 जुलै 2025, म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे.
त्याचबरोबर कंपनीने या फोनसाठी Flipkart या प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक मायक्रोसाईट सुद्धा तयार केली आहे, ज्यामध्ये Vivo X200 FE चे काही खास फीचर्स आधीच उघड करण्यात आले आहेत.
Vivo X200 FE ची भारतातील किंमत किती असू शकते?
Vivo X200 FE स्मार्टफोनच्या किंमतीबाबत सध्या कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. त्यामुळे याची अचूक किंमत काय असेल, हे सांगणे थोडे कठीण आहे. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार, या फोनच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹54,999 असू शकते, तर 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹59,999 पर्यंत जाऊ शकते.
अशी अपेक्षित किंमत असण्याचं मुख्य कारण म्हणजे, Vivo X200 FE हा फोन थेट Samsung आणि iPhone सारख्या प्रीमियम ब्रँड्सना स्पर्धा देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
Vivo X200 FE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले : Vivo X200 FE डिस्प्ले फीचर्सबद्दल सांगायचं झालं, तर या स्मार्टफोनमध्ये 6.31 इंचाचा 1.5K AMOLED LTPO डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या डिस्प्लेचं रिझोल्यूशन 1216 x 2640 पिक्सल असून, 460ppi ची पिक्सेल डेंसिटी आहे. यामध्ये 1800 निट्सची पीक ब्राइटनेस दिली आहे, जी उन्हातही स्पष्ट दिसण्यासाठी उपयुक्त ठरते. फोनमध्ये फ्लॅट OLED पॅनल असून, त्याला Schott Xensation Core किंवा Shield Glass सारखं मजबूत प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. गेमिंग आणि मल्टिमीडिया अनुभवासाठी हा डिस्प्ले एकदम परफेक्ट आहे.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स : या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ हा शक्तिशाली ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे, जो 3.4GHz पर्यंत स्पीड देतो. यासोबत 12GB किंवा 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB किंवा 512GB UFS 3.1 स्टोरेज सुद्धा दिली जाणार आहे. फोनचा AnTuTu स्कोअर 2.1 मिलियनपेक्षा जास्त असण्याबाबत कंपनीने स्पष्ट मत मांडले आहे, जो हेवी ॲप्स, गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम मानला जातो. या व्यतिरिक्त या फोन मध्ये एफिशिएंट कूलिंग सिस्टम सुद्धा देण्यात आला आहे.
कॅमेरा : Vivo X200 FE स्मार्टफोनच्या मागील बाजूस ZEISS ट्यून केलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP टेलीफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. तसेच, फ्रंटला 50MP अल्ट्रा-वाइड सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो ग्रुप सेल्फी आणि व्लॉगिंगसाठी आदर्श आहे. कॅमेरा सेटअपमध्ये ZEISS Multifocal Portrait मोड, Street Photography Mode आणि AI Image Studio यांसारखे प्रो-लेव्हल फीचर्स देण्यात आले आहेत. शिवाय, या फोनमध्ये 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगचा सपोर्टसुद्धा मिळतो, जो व्हिडिओ कंटेंट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरतो.
बॅटरी आणि चार्जिंग : Vivo X200 FE फोनमध्ये 6,500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते तसेच एकदा चार्ज केल्यानंतर ही बॅटरी हेवी युजमध्ये संपूर्ण दिवस आणि मिडीयम युजमध्ये दोन दिवस टिकू शकते.
डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी : Vivo X200 FE चे वजन फक्त 186 ग्रॅम असून जाडी 7.99mm एवढी आहे. फोनमध्ये मेटल फ्रेम आणि मॅट फिनिशसह स्लीक आणि प्रीमियम लुक दिला आहे. त्याचबरोबर हा फोन IP68 आणि IP69 रेटिंगसह येतो, म्हणजेच तो पाण्यात आणि धुळीत टिकाऊ आहे. कलर ऑप्शन्समध्ये तीन जबरदस्त कलर पाहायला मिळणार आहे Amber Yellow, Frost Blue आणि Luxe Black
सॉफ्टवेअर आणि यूजर इंटरफेस : Vivo X200 FE हा फोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर चालतो. यामध्ये Gemini Assistant, कस्टमायझेबल लेआउट्स, स्क्रीन शेअरिंग प्रायव्हसी, अननोन नंबर ओळखण्याची सुविधा आणि Circle to Search यासारखे स्मार्ट फीचर्स मिळणार आहे.
AI आणि इतर फीचर्स : Vivo X200 FE मध्ये बरेच एआय फीचर्स देण्यात आलेले आहे जसे की AI Smart Office Mode, Real-time Translation, AI Transcript Assist तसेच Dual Stereo Speakers, -20°C पर्यंत Freeze Resistance आणि प्रोग्रामेबल शॉर्टकट बटण ही दिलं आहे.