OPPO Reno 14 Series लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, या सिरीज अंतर्गत दोन जबरदस्त स्मार्टफोन – OPPO Reno 14 5G आणि Reno 14 Pro 5G – लाँच होणार आहेत. दोन्ही फोन आकर्षक डिझाइन, प्रीमियम लुक आणि शानदार कॅमेरा सेटअपसह येतील. विशेष म्हणजे, OPPO ही सिरीज मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर करणार असून, किमत ₹40,000 च्या आत असण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल ज्यामध्ये उत्तम कॅमेरा, दमदार बॅटरी आणि स्मूथ परफॉर्मन्स मिळेल, तर OPPO Reno 14 Series तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो. या सिरीजमधील दोन्ही फोनबाबत सविस्तर माहिती आम्ही खाली दिली आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल. तर चला, जाणून घेऊया OPPO Reno 14 Series चे खास फीचर्स आणि लाँच डिटेल्स!
कधी होणार OPPO Reno 14 Series भारतात लॉन्च?
ओप्पोने आपल्या अधिकृत वेबसाइट ‘OPPO India’ वर Reno 14 Series साठी एक मायक्रो साईट तयार करून ती लाईव्ह केली आहे. या साईटमध्ये टिझरच्या माध्यमातून या अपकमिंग सिरीजमधील स्मार्टफोन्सचा लुक आणि डिझाईनची झलक देण्यात आली आहे. मात्र, सध्या तरी कंपनीने या सिरीजच्या अधिकृत लॉन्च तारखेची घोषणा केलेली नाही. तरीही लीक रिपोर्ट्सनुसार, OPPO Reno 14 Series भारतात जून महिन्याच्या शेवटी लाँच होण्याची शक्यता आहे.
OPPO Reno 14 आणि 14 Pro चे खास फीचर्स स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन बदल सांगायचं झालं, तर कंपनीने भारतात येणाऱ्या OPPO Reno 14 Series च्या फोनचे स्पेसिफिकेशन अजून अधिकृतपणे शेअर केलेले नाहीत. मात्र, हीच सिरीज काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लॉन्च करण्यात आली असून, त्याच आधारे संभाव्य स्पेसिफिकेशन्स पुढीलप्रमाणे असू शकतात:
डिस्प्ले: OPPO Reno 14 5G मध्ये 6.59-इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200nits पीक ब्राइटनेससह येतो. या डिस्प्लेला Crystal Shield Glass प्रोटेक्शन मिळते आणि हा फोन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. दुसरीकडे, OPPO Reno 14 Pro 5G मध्ये 6.83-इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200nits ब्राइटनेस दिला आहे. यामध्ये सुद्धा Crystal Shield Glass प्रोटेक्शन आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
प्रोसेसर: दोन्ही फोन Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात आणि त्यामध्ये MediaTek Dimensity 8450 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे, जो 3.25GHz क्लॉक स्पीडवर काम करतो.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी OPPO Reno 14 5G मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP wide-angle OIS सेंसर, 50MP telephoto लेंस आणि 8MP ultra-wide-angle लेंसचा समावेश आहे. याशिवाय सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. OPPO Reno 14 Pro 5G मध्येही मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 50MP wide-angle OIS सेंसर, 116° FOV असलेला 50MP ultra-wide-angle लेंस आणि 80mm फोकल लेंथसह 50MP telephoto लेंस दिला आहे. या फोनमध्येही 50MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: OPPO Reno 14 5G मध्ये 6000mAh बॅटरी दिली असून ती 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर OPPO Reno 14 Pro 5G मध्ये 6200mAh ची मोठी बॅटरी आहे, जी सुद्धा 80W फास्ट चार्जिंगसह येते.
OPPO Reno 14 आणि 14 Pro फोनची संभाव्य किंमत आणि सेगमेंट
ओप्पो Reno 14 सिरीजला कंपनी मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर करणार आहे. Reno 14 5G या सिरीजचा बेस मॉडेल असून याची सुरुवातीची किंमत सुमारे ₹40,000 च्या आसपास ठेवली जाऊ शकते. काही खास बँक ऑफर्स आणि लॉन्चिंग डिस्काउंट्ससह हा फोन ₹39,999 मध्ये खरेदी करता येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, Reno 14 Pro 5G हा हाय-एंड मॉडेल असून त्याची सुरुवातीची किंमत बेस मॉडेलपेक्षा जवळपास ₹10,000 अधिक असू शकते. यामध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले असून त्याची संभाव्य किंमत ₹50,000 पर्यंत जाऊ शकते. बँक डील्स आणि लॉन्च ऑफर्ससह हा फोन ₹49,999 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकृत किंमत आणि ऑफर्सची माहिती लॉन्चवेळीच स्पष्ट होणार आहे.