चायनीज स्मार्टफोन ब्रँड OnePlus कडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 8 जुलै रोजी कंपनी आपल्या OnePlus Nord सिरीजमध्ये दोन दमदार स्मार्टफोन लाँच करणार आहे – OnePlus Nord 5 आणि OnePlus Nord CE 5. हे दोन्ही फोन्स मिड-रेंज प्राइस सेगमेंटमध्ये असणार आहेत, पण त्यात तुम्हाला प्रीमियम फिचर्सचा अनुभव मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 5 मध्ये 7100mAh ची प्रचंड मोठी बॅटरी आणि 50MP चा मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. म्हणजेच, युजर्सना दमदार परफॉर्मन्स आणि लांब टिकणारी बॅटरी लाईफ याचा फुल पॅकेज अनुभव मिळेल.
वन प्लस आपल्या चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण करत आहे. म्हणूनच लाँचपूर्वीच कंपनीने OnePlus Nord CE 5 चे अनेक स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे जाहीर केले आहेत – जे या स्मार्टफोनबद्दलची उत्सुकता आणखी वाढवत आहेत.
या लेखात आपण OnePlus च्या या नव्या स्मार्टफोन्सबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.
तर चला, सुरुवात करूया!
OnePlus Nord CE 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
वनप्लस Nord CE 5 हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये असूनही त्यात अनेक प्रीमियम फीचर्स दिले जाणार आहेत. कंपनीने याचे बरेचसे स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे कन्फर्म केले आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, या फोनमध्ये लेटेस्ट MediaTek Dimensity 8350 Apex चिपसेट वापरण्यात आलेला आहे, जो 4nm टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. यासोबत Mali-G615 GPU सुद्धा दिलेला आहे, जो गेमिंगसाठी खूपच पॉवरफुल आहे. या फोनचा AnTuTu स्कोअर 1.47 मिलियन पेक्षा जास्त आहे, जो त्याच्या परफॉर्मन्सला अधोरेखित करतो.
फोनमध्ये LPDDR5X RAM वापरण्यात आलेली आहे, जी वेगवान आणि पॉवर एफिशियंट आहे. यामुळे गेमिंग अनुभव आणखी स्मूथ होतो. विशेष म्हणजे, BGMI आणि COD Mobile सारख्या गेम्समध्ये 120fps पर्यंत गेमिंग एक्सपीरियन्स मिळणार आहे.
बॅटरी परफॉर्मन्स हाही या फोनचा एक महत्त्वाचा हायलाईटेड पॉईंट आहे. त्यानुसार OnePlus Nord CE 5 मध्ये 7100mAh ची जबरदस्त बॅटरी दिली जाणार असून ती 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी फक्त 59 मिनिटांमध्ये 1% वरून 100% पर्यंत चार्ज होते. एवढंच नाही, तर फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 6 तास यूट्यूब प्लेबॅक मिळतो. यासोबत बायपास चार्जिंग आणि Battery Health Magic सारखे स्मार्ट फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत, जे बॅटरीच्या लाईफला दीर्घकाळ टिकवतात.
कॅमेरा सेगमेंटमध्ये देखील OnePlus ने मोठी उडी घेतली आहे. कंपनीने कन्फर्म केलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 50MP चा Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा सेंसर दिला जाणार आहे, जो OIS (Optical Image Stabilization) सह येतो. यामुळे फोटो आणि व्हिडिओ अधिक शार्प आणि स्टेबल राहतात. हा कॅमेरा 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतो. यासोबत RAW HDR आणि Real Tone टेक्नोलॉजी देखील दिली आहे, जी याआधी OnePlus 13 सिरीजमध्ये वापरली गेली होती. यात Ultra HDR सपोर्ट देखील दिला जाणार आहे, जे लाईव्ह फोटोसाठी उपयुक्त ठरेल.
डिझाइन आणि इतर वैशिष्ट्यांमध्ये, OnePlus Nord CE 5 मध्ये 6.77-इंचाचा FHD+ फ्लॅट AMOLED डिस्प्ले दिला जाणार असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 16MP फ्रंट सेल्फी कॅमेरा देखील मिळेल. याचा डिझाईन पॉलीकार्बोनेट बॅक आणि फ्रेमसह curved edges मध्ये असेल, तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IP54 डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टन्स, आणि हायब्रिड सिम स्लॉट हे फीचर्स देखील असण्याची शक्यता आहे.
सॉफ्टवेअरबाबत बोलायचं झालं तर, फोनमध्ये Android 15 वर आधारित OxygenOS 15 प्री-इंस्टॉल असणार आहे. भारतात हा फोन 12 जुलै 2025 पासून OnePlus India वेबसाइट, Amazon आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध होईल. लीकनुसार, याची सुरुवातीची किंमत ₹25,000 च्या आसपास असू शकते, मात्र अंतिम किंमत 8 जुलैच्या लाँच इव्हेंटमध्ये स्पष्ट होईल.
आणखी वाचा
- POCO F7 भारतात या दिवशी होणार लाँच , मिळणार जबरदस्त गेमिंग प्रोसेसर आणि मोठी बॅटरी
- Samsung Galaxy M36 5G लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या कोणते फीचर्स आधीच झाले लीक!
- OPPO Reno 14 आणि Reno 14 Pro भारतात होणार लवकरच लॉन्च, कॅमेरा असेल जबरदस्त!
- ₹10,000 च्या आत मिळणारे टॉप 5 5G स्मार्टफोन – कमी बजेटमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स!