Maruti Suzuki Escudo: भारताची सगळ्यात मोठी कार बनवणारी कंपनी मारुती सुजुकी SUV सेगमेंटमध्ये सध्या जबरदस्त तयारी करत आहे. ब्रेझा आणि ग्रँड विटारा यासारख्या हिट SUV नंतर आता कंपनी एक नवी कॉम्पॅक्ट SUV घेऊन येणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अलीकडे सोशल मिडिया आणि ऑटो न्यूज पोर्टल्सवर ‘Escudo’ नावाची SUV चर्चेचा विषय बनली आहे
आता तुम्ही विचार करत असाल की ही Escudo SUV आहे तरी काय? तर थोडक्यात सांगायचे असेल तर, ही SUV जपानमध्ये आधीच Suzuki Vitara या नावाने इंटरनॅशनल व्हर्जन म्हणून येऊन गेली आहे, आणि आता भारतातही तिची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मारुती सुजुकीने ‘Escudo’ आणि ‘Torqnado’ ही दोन नावं भारतात ट्रेडमार्क केल्याचंही समोर आलं आहे, ज्यामुळे ही SUV भारतात लवकरच येऊ शकते अशी बातमी सोशल मीडिया वर पसरत आहे.
पण ही Escudo SUV नेमकी आहे तरी काय? आणि ती Brezza आणि Grand Vitara च्या मधे कशी बसते? याचं डिझाइन, फीचर्स, परफॉर्मन्स, आणि लाँच डेटबद्दल चला जाणून घेऊया सविस्तर..
Maruti Suzuki Escudo SUV म्हणजे काय?
Maruti Suzuki Escudo ही एक कॉम्पॅक्ट SUV आहे, जी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आधीपासून Suzuki Vitara म्हणून ओळखली जाते. कंपनीने भारतीय बाजारातही याचे नाव ट्रेडमार्क केल्याने, आता ही SUV भारतात सादर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Escudo ही मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये Brezza आणि Grand Vitara यांच्यामधली SUV असेल, जी कॉम्पॅक्ट आकारात असेल पण फीचर्समध्ये जबरदस्त असेल.
Escudo चं डिझाईन इंटरनॅशनल मॉडेलप्रमाणे स्टायलिश आणि आधुनिक असेल, ज्यामध्ये SUV सेगमेंटमध्ये आवश्यक असणारे सगळे बेसिक आणि प्रीमियम फीचर्स असतील. ही SUV प्रामुख्याने अर्बन आणि फॅमिली युजर्सना टार्गेट करेल
Escudo चं डिझाईन आणि इंटीरियर कसं असेल?

Maruti Suzuki Escudo बद्दल अद्याप अधिकृत माहिती जरी समोर आलेली नसली, तरी उपलब्ध रिपोर्ट्सवरून या SUV चं डिझाईन क्लासिक आणि दमदार SUV लूकसह येण्याची शक्यता आहे. असं मानलं जातं की यामध्ये स्क्वायर स्टान्स (square stance) असू शकतो, ज्यामुळे ही गाडी रस्त्यावर एक ठसठशीत उपस्थिती दर्शवू शकेल. ग्रँड विटारा पेक्षा याचा फ्रंट डिझाईन अधिक upright म्हणजे उभा आणि रेखीव असण्याची शक्यता आहे. क्लॅडिंग कमी असले तरीही ही गाडी मजबूत आणि आकर्षक वाटेल असा अंदाज आहे.
इंटीरियरबाबत अजून पुष्टी झालेली माहिती नाही, पण मारुती सुजुकीच्या इतर प्रीमियम SUV मॉडेल्सच्या अनुभवावरून बोलायचं झालं, तर यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि आरामदायक सीट्स मिळू शकतात. शिवाय, Escudo ही SUV Brezza आणि Grand Vitara यांच्या दरम्यानची असल्यामुळे यामध्ये दोन्हींचे काही फीचर्स आणि लेआउट पाहायला मिळू शकतात.
Escudo कधी लॉन्च होणार आणि संभाव्य किंमत किती असू शकते?
Maruti Suzuki Escudo ही मारुतीची बहुचर्चित SUV येत्या 2025 मध्ये सादर होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही SUV सप्टेंबर 2025 च्या आसपास, म्हणजेच दिवाळीपूर्वी भारतीय बाजारात आणण्याचा प्लॅन करत आहे. कंपनीने यासाठी आधीच “Escudo” आणि “Torqnado” ही नावं ट्रेडमार्क केली असून, त्यामुळे लॉन्चची तयारी अंतिम टप्प्यात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किंमतीबाबत बोलायचं झालं, तर Escudo ची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत सुमारे ₹9.7 लाख ठेवली जाऊ शकते, जी Brezza च्या मिड व्हेरिएंटपेक्षा थोडी जास्त आणि Grand Vitara च्या बेस व्हेरिएंटपेक्षा सुमारे ₹1 लाख कमी असेल. त्यामुळे ही SUV किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत खूप बॅलन्स्ड पर्याय ठरू शकते. ही SUV Arena डीलरशिपद्वारे विकली जाणारी सर्वात प्रीमियम आणि फीचर्स-युक्त SUV ठरू शकते, अशी शक्यता आहे.
इंजिन आणि मायलेज – किती पावरफुल असेल Escudo?
Maruti Suzuki Escudo मध्ये कंपनीचा 1.5 लिटर नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिला जाऊ शकतो, जो सध्या Ertiga आणि Grand Vitara मध्ये वापरला जातो. हा इंजिन माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्तम मायलेजसह चांगली परफॉर्मन्सही मिळेल. गिअरबॉक्सबाबत बोलायचं झालं, तर Escudo मध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन चे पर्याय असू शकतात.
याशिवाय, CNG वर्जन देखील उपलब्ध करून देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जे ग्राहकांसाठी एक इकोनॉमिकल पर्याय ठरू शकतो. मात्र, ग्रँड विटाराच्या तुलनेत ही SUV किंमतीत थोडी कमी ठेवण्यासाठी, यात फुल हायब्रिड सेटअप दिला जाणार नाही, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे Escudo ही एक बॅलन्स्ड परफॉर्मन्स आणि मायलेज देणारी SUV ठरणार आहे.
Maruti Suzuki Escudo मध्ये कोणते फीचर्स मिळतील?
Maruti Suzuki Escudo मध्ये आधुनिक SUV प्रमाणे एकदम स्मार्ट आणि प्रॅक्टिकल फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नव्या डिझाइनसह डॅशबोर्ड, मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, आणि वायरलेस Apple CarPlay/Android Auto सपोर्ट मिळू शकतो. याशिवाय, एक फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळू शकतो, जो या SUV ला टेक-सॅव्ही बनवतो. मात्र, Grand Vitara मध्ये दिलेला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक Escudo मध्ये नसेल, असं संकेत आहेत.
फील-गुड फीचर्सबाबत बोलायचं झालं, तर यामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ आणि वेंटिलेटेड फ्रंट सीट्स मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या बाबतीत, ही SUV 6 एअरबॅग्स, ABS, ESC, आणि तीन पॉइंट सीट बेल्ट रिमाइंडर यांसारख्या स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह येऊ शकते. वरच्या ट्रिममध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि Level 1 ADAS (Advanced Driving Assistance System) सारखे प्रीमियम फीचर्सही मिळू शकतात. काही तज्ञांचा अंदाज आहे की, ही SUV भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवू शकते, कारण मारुती आता आपल्या कार्सला अधिक सुरक्षित बनवण्यावर भर देत आहे.
ही SUV कुणासाठी योग्य ठरेल?
Maruti Suzuki Escudo ही SUV खासकरून शहरी भागात राहणाऱ्या आणि फॅमिली वापरासाठी मजबूत, स्टायलिश आणि किफायतशीर SUV शोधणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य ठरू शकते. ज्यांना Brezza थोडी छोटी वाटते पण Grand Vitara चं बजेट थोडं जड जातं – अशा लोकांसाठी Escudo एक मध्यममार्ग ठरेल.
तसंच, ज्यांना टेक्नॉलॉजी फीचर्स, माईल्ड हायब्रिड इंजिन आणि आरामदायक प्रवास हवा आहे पण Nexa चॅनेलचा प्रीमियम टॅग नकोय – त्यांच्यासाठी Arena डीलरशिपद्वारे मिळणारी Escudo एक परफेक्ट चॉइस ठरू शकते.
ब्रेजा आणि ग्रँड विटारा यांच्यामधील याची जागा काय असेल?
Maruti Escudo ही SUV कंपनीच्या SUV पोर्टफोलिओमध्ये Brezza आणि Grand Vitara यांच्या मधल्या जागेवर पोजिशन केली जाणार आहे. याला Y17 कोडनेम दिलं जाऊ शकतं आणि ही SUV Suzuki च्या ग्लोबल C-प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे, ज्याच्यावर Grand Vitara देखील बनवलेली आहे. त्यामुळे Escudo मध्ये मोठा व्हीलबेस आणि spacious केबिन मिळण्याची अपेक्षा आहे, जे फॅमिली युजर्ससाठी फायदेशीर ठरेल.
Grand Vitara सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार असूनही, Escudo ही SUV थोडी अधिक किफायतशीर (affordable) असेल. Grand Vitara जशी Nexa डीलरशिप्समधून विकली जाते, तशी Escudo मात्र Arena डीलरशिप्सद्वारे विकली जाणार आहे. यामुळे ही SUV अधिक मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचेल, आणि मारुतीला कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये आणखी मजबूत उपस्थिती मिळवून देईल.