भारताची पहिली 100cc Flex Fuel बाईक – जाणून घ्या कधी होणार लॉन्च आणि काय असतील फीचर्स

Mithun Rathod
4 Min Read
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? हिरो मोटोकॉर्प लवकरच एक अशी भन्नाट बाईक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे, जी तुम्ही पेट्रोलशिवाय चालवू शकता! होय, ऐकून थोडं अचंबित वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे. या बाइक च नाव HF Deluxe Flex ठेवण्यात आले आहे चला तर मग, जाणून घेऊया New Hero HF Deluxe Flex Fuel या खास बाईकबद्दल सविस्तर माहिती.

भारतातील पहिली 100cc Flex Fuel बाइक

Hero MotoCorp लवकरच त्यांच्या लोकप्रिय HF Deluxe बाईकचा Flex Fuel वर्जन लॉन्च करणार आहे. ही बाईक खास यासाठी महत्त्वाची ठरणार आहे कारण ही भारताची पहिली 100cc Flex Fuel बाइक असेल जी पेट्रोलऐवजी इथेनॉलवर चालेल. हे इंधन केवळ पर्यावरणपूरक नसून, सामान्य माणसाच्या खिशालाही दिलासा देणारं आहे. वाढत्या पेट्रोलच्या किमतींमध्ये Flex Fuel एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Flex Fuel म्हणजे काय ?

Flex Fuel ही अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे जिच्यामध्ये बाईकचं इंजिन पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणावर चालू शकतं. New HF Deluxe Flex Fuel ही बाईक 20% ते 85% इथेनॉल मिश्रण असलेल्या इंधनावर सहज चालू शकते, त्यामुळे पेट्रोलचा खर्च कमी होतो आणि बाईक अधिक eco-friendly बनते.

डिझाईनमध्ये नवीनता आणि पर्यावरणाचा इशारा

New Hero HF Deluxe Flex Fuel चं डिझाईन पारंपरिक HF Deluxe सारखंच असलं तरी, यात नवीन ग्राफिक्स आणि ड्युअल टोन रंगसंगती दिली गेली आहे. हिरवा आणि पिवळा रंग यामध्ये प्रमुख आहे — जो पर्यावरणाशी जोडलेला भाव व्यक्त करतो.
बॉडीवर असलेलं Flex Fuel ब्रँडिंग या बाईकला इतर मॉडेल्सपेक्षा वेगळं आणि आकर्षक लुक देतं.

दमदार परफॉर्मन्स – किंमतीवर भार न येता

या बाईकमध्ये 97.2cc एअर कूल्ड, 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आलं आहे, जे 7.91 PS ची पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करतं.
हेच इंजिन रेग्युलर HF Deluxe मध्येही आहे, परंतु Flex Fuel साठी याला खास ट्यूनिंग करण्यात आलं आहे. सिटी राइडिंगसाठी ही बाईक एकदम स्मूथ आणि विश्वासार्ह परफॉर्मर ठरणार आहे.

मायलेज दमदार, आणि पेट्रोलचा खर्च झटकन संपला!

Flex Fuel बाईकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वस्त इंधन आणि चांगलं मायलेज. इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत खूप स्वस्त असल्यामुळे, यामुळे तुम्हाला प्रति लिटर खर्चात मोठी बचत होऊ शकते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक 60 ते 70 किमी/लिटर चं मायलेज देऊ शकते – तेही इथेनॉलवर!

पर्यावरणासाठी एक उत्तम पाऊल

Flex Fuel तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे, ही बाईक ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनात घट घडवते. इथेनॉल हे ऊस आणि इतर कृषी उत्पादनांपासून बनवलं जातं, त्यामुळे हे इंधन नविकरणीय (renewable) आहे आणि climate change विरुद्धच्या लढ्यात एक सकारात्मक पाऊल ठरतं.

Hero HF Deluxe Flex Fuel किंमत आणि लॉन्च तारीख

Hero MotoCorp ने सध्या पर्यंत Hero HF Deluxe Flex Fuel या बाईकची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही आहे. मात्र ऑटोमोबाईल तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ही बाईक ₹60,000 ते ₹70,000 या किमतीच्या दरम्यान उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हीरोने ही बाईक सामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये फिट बसावी आणि पेट्रोलच्या खर्चापासून सूट मिळावी यासाठी डिझाइन केली आहे.

विशेष म्हणजे, ही बाईक जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात, म्हणजेच July Last Week मध्ये भारतात अधिकृतपणे लॉन्च होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलच्या कटकटीला रामराम करायचा असेल आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधत असाल, तर ही Hero HF Deluxe Flex Fuel बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

निष्कर्ष

Hero HF Deluxe Flex Fuel केवळ एक नवीन बाईक नाही, तर ती भारतातील ऑटोमोबाईल फ्यूचरकडे एक पुढचं पाऊल आहे.
ज्यांना eco-friendly, किफायतशीर आणि रोजच्या वापरासाठी मजबूत बाइक हवी आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम निवड ठरू शकते.
आता पेट्रोलच्या किंमतीने डोकंदुखी नाही, कारण इथेनॉल तुमचं बजेट आणि पर्यावरण दोन्ही वाचवेल!

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Share This Article
Follow:
नमस्कार! मी मिथुन राठोड. मला ऑटोमोबाईल क्षेत्रात लेखनाचा सुमारे 6 महिन्यांचा अनुभव आहे. याआधी मी इतर ठिकाणी लेखन केलं आहे आणि आता मी ZakkasNews.com वर नियमितपणे कार, बाईक, त्यांचे फीचर्स, किंमती, लॉन्च डेट, तुलना आणि रिव्ह्यू यासारख्या विषयांवर लेख लिहितो. माझं लिखाण सोपं, माहितीपूर्ण आणि वाचकांसाठी उपयुक्त असावं याकडे मी विशेष लक्ष देतो. नवीन वाहनांची खरी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *