Vivo चे दोन नवे फोन लाँचपूर्वीच चर्चेत, X Fold 5 आणि X200 FE ची माहिती आली समोर

Amol Pawar
Amol Pawar
मी अमोल पवार आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून टेक्नॉलॉजी व ऑटो क्षेत्राशी संबंधित माहिती मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवतो. zakkasnews.com वर मी मोबाईल, बाईक, स्कूटर, नवीन लॉन्च व...
5 Min Read
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Vivo कडून एक नवीन आणि उत्साही बातमी समोर आली आहे! येत्या 14 जुलैला, कंपनी आपल्या दोन दमदार स्मार्टफोन – Vivo X Fold 5 आणि Vivo X200 FE – भारतात लॉन्च करणार आहे. यासंदर्भात Vivo ने अधिकृत माहितीही शेअर केली आहे. या दोन्ही स्मार्टफोनची आधीच जपान आणि चीनमध्ये यशस्वी लॉन्चिंग झाली असून, आता ते Flipkart च्या माध्यमातून भारतीय बाजारात दाखल होणार आहेत.

Vivo X200 FE हा स्मार्टफोन विशेषतः त्या युजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना कमी किमतीत प्रीमियम फीचर्सचा अनुभव घ्यायचा आहे. यात दमदार बॅटरी, AI बेस्ड फीचर्स, शानदार डिस्प्ले आणि शक्तिशाली प्रोसेसर पाहायला मिळणार आहे.

दुसरीकडे, Vivo X Fold 5 हा एक प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 8.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे – जो त्याच्या फोल्डिंग डिझाइनसोबत एक आकर्षक अनुभव देतो.

टिप्सटर Abhishek Yadav (@yabhishekhd) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दोन्ही स्मार्टफोनच्या संभाव्य किंमतीबाबत माहिती दिली आहे. तसेच कंपनीकडूनही काही महत्त्वाचे फीचर्स उघड करण्यात आले आहेत. चला तर मग, या लेखात जाणून घेऊया Vivo च्या या आगामी स्मार्टफोन बद्दल सविस्तर माहिती!

Vivo X200 FE आणि Vivo X Fold 5 ची किंमत ?

टिप्सटर Abhishek Yadav (@yabhishekhd) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या माहितीनुसार, भारतात Vivo X Fold 5 च्या 16GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹1,49,999 असणार आहे. तर दुसरीकडे, Vivo X200 FE देखील 16GB RAM आणि 512GB स्टोरेजसह बाजारात येणार असून, त्याची किंमत सुमारे ₹59,999 ठेवण्यात आली आहे. दोन्ही फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये येत असून, दमदार फीचर्ससह जबरदस्त परफॉर्मन्स देण्याचे आश्वासन Vivo ने दिलं आहे.

Vivo X200 FE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo X200 FE हा फोन खास अशा युजर्ससाठी आणला जातोय ज्यांना कमी बजेटमध्येही प्रीमियम फील हवा आहे. यामध्ये 6.31 इंचाचा सुंदर आणि ब्राइट 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 5000 निट्स ब्राइटनेससह येतो. स्क्रीन इतकी क्लियर आहे की, सूर्यप्रकाशातसुद्धा ती खूपच चांगली दिसते. Vivo ने यात MediaTek Dimensity 9300+ सारखा दमदार प्रोसेसर दिला असून, तो Android 15 आधारित Funtouch OS 15 वर चालतो –

म्हणजे परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर दोन्ही अगदी स्मूद असणार. 12GB आणि 16GB RAM पर्यायांसह 256GB आणि 512GB स्टोरेज मिळतं, म्हणजे तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ आणि अ‍ॅप्स भरपूर प्रमाणात साठवू शकता. कॅमेराबद्दल सांगायचं झालं, तर 50MP चा Sony IMX921 सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP टेलिफोटो लेन्समुळे प्रत्येक फोटो प्रो लेव्हलचा वाटेल.

सेल्फीप्रेमींसाठी 50MP चा AI सेल्फी कॅमेरा दिला आहे. AI चे फीचर्सही भन्नाट आहेत – AI Magic Move, AI कॅप्शन्स आणि Reflection Erase यामुळे फोटो एडिटिंग अगदी सहज होणार. इतकंच नाही, तर 6500mAh ची मोठी बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगमुळे फोन दिवसभर आरामात चालेल आणि फक्त काही मिनिटांत चार्ज होईल. IP68/69 रेटिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट, Wi-Fi 7, आणि ड्युअल स्पीकर्ससारखी हाय-एंड फीचर्स या फोनमध्ये दिली आहेत, म्हणजे अगदी प्रीमियम अनुभव मिळणार आहे – तोही थोडक्याच पैशात.

Vivo X Fold 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

दुसरीकडे, Vivo X Fold 5 हा खरंच एक खास फोन आहे. हा फोल्डेबल स्मार्टफोन त्या लोकांसाठी आहे ज्यांना काहीतरी हटके आणि फ्युचरिस्टिक हवंय. यामध्ये 8.03 इंचाचा भला मोठा 2K+ LTPO AMOLED मुख्य डिस्प्ले आहे आणि 6.53 इंचाचा कव्हर डिस्प्लेही देण्यात आला आहे, दोन्ही 120Hz च्या सपोर्टसह.

या दोन्ही स्क्रीन्स इतक्या सुंदर आहेत की, व्हिडीओ पाहताना किंवा मल्टिटास्क करताना डोळ्यांना सुखद अनुभव मिळतो. Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरमुळे परफॉर्मन्सचा प्रश्नच नाही – गेमिंग, एडिटिंग, मल्टिटास्किंग सगळं एकदम स्मूद चालणार. यामध्ये 12GB आणि 16GB RAM सोबत 256GB ते 1TB पर्यंत स्टोरेज मिळतं – म्हणजे स्पेसची कधीही कमतरता जाणवणार नाही.

Zeiss ब्रँडेड 50MP कॅमेरा सेटअपमुळे फोटो क्लिक करताना DSLR चा अनुभव येतो. याशिवाय 6000mAh ची दमदार बॅटरी, 80W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगसह या फोनला चार्जिंगसुद्धा झपाट्याने होते. हा फोन इतका मजबूत बनवला आहे की 6 लाख वेळा फोल्ड केला तरी टिकून राहतो, आणि त्याला IPX8/IPX9 सर्टिफिकेशनसुद्धा आहे – म्हणजे पाणी आणि धुळीपासूनही सुरक्षित. Apple, MacBook आणि iCloud ड्रॅग-अँड-ड्रॉप सपोर्ट, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट, थ्री-स्टेज अलर्ट स्लायडर, हे सगळं मिळून X Fold 5 ला एक फ्युचरिस्टिक, प्रीमियम आणि क्लास अपील देतात.

आणखी वाचा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Share This Article
Follow:
मी अमोल पवार आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून टेक्नॉलॉजी व ऑटो क्षेत्राशी संबंधित माहिती मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवतो. zakkasnews.com वर मी मोबाईल, बाईक, स्कूटर, नवीन लॉन्च व ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी संबंधित बातम्या, रिव्ह्यू व तुलना सादर करतो. माझं उद्दिष्ट आहे – माहिती सरळ आणि उपयुक्त भाषेत देणं. 👉 माझ्याबद्दल अधिक जाणून घ्या
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *