Vikas Divyakirti Net Worth 2025: किती संपत्तीचे मालक आहेत Drishti IAS चे संस्थापक?

Sachin Rathod
3 Min Read
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

डॉ. विकास दिव्य कीर्ती हे UPSC परीक्षेच्या तयारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या Drishti IAS कोचिंग सेंटरचे संस्थापक आहेत. लाखो विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणारे युवक-युवती त्यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्या बोलण्यात असणारी सहजता, शांत स्वभाव, स्पष्ट विचार आणि जिद्द यांनी त्यांनी आपल्या कार्यात वेगळेपणा निर्माण केला आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थी त्यांच्या जीवनशैलीबद्दल, यशाच्या प्रवासाबद्दल आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतात.

तर चला मग सुरु करूया…..

डॉ. विकास दिव्य कीर्ती यांची Net Worth

शिक्षणाच्या क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या विकास सरांची संपत्ती आज 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणजे Drishti IAS Coaching Centre. या संस्थेत दरवर्षी हजारो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात. यातून त्यांना दरवर्षी सुमारे 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न होते.

याशिवाय, ते UPSC वर आधारित अनेक पुस्तके लिहितात, ज्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यातूनही त्यांना चांगली कमाई होते. ते मोटिवेशनल सेमिनारसाठीही हजारों रुपये फी घेतात. अनेक वेळा ते वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, इव्हेंट्समध्ये बोलण्यासाठी जातात.

ते सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. त्यांच्या वैयक्तिक यूट्यूब चॅनेलवर 40 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तसेच Drishti IAS चा अधिकृत यूट्यूब चॅनेलसुद्धा खूप प्रसिद्ध असून त्यावर 1.24 कोटीहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. यूट्यूबवरून मिळणारे उत्पन्नही त्यांच्या एकूण संपत्तीत मोठे योगदान देते.

करिअरचा प्रवास

विकास दिव्य कीर्ती यांनी 1996 साली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा दिली आणि AIR 384 हा रँक मिळवून यश संपादन केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी Central Secretariat Services मध्ये अधिकारी म्हणून काम केलं. मात्र, सरकारी नोकरी करत असतानाच त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याची ओढ वाटत होती. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन 1999 साली Drishti IAS Coaching Centre ची सुरुवात केली.

आज त्या संस्थेतून दरवर्षी हजारो विद्यार्थी UPSC परीक्षेत उत्तीर्ण होतात. त्यांनी केवळ कोचिंगच नाही, तर एक मोटिवेशनल शिक्षक, लेखक, आणि सोशल मीडिया आयकॉन म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

डॉ. विकास दिव्य कीर्ती यांचे जीवनचरित्र

  • पूर्ण नाव: डॉ. विकास दिव्य कीर्ती
  • जन्म: हरियाणा राज्यात
  • शिक्षण: दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण
  • UPSC रँक: AIR 384 (1996)
  • पूर्वीची नोकरी: सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसेस
  • सध्याचे कार्य: Drishti IAS चे संस्थापक व संचालक
  • वैवाहिक स्थिती: विवाहित
  • अभिरुची: लेखन, अध्यापन, विचारमंथन

डॉ. विकास दिव्य कीर्ती हे आज फक्त शिक्षक नाहीत, तर हजारो विद्यार्थ्यांसाठी ते एक मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांची कधीही हार न मानणारी वृत्ती आणि सकारात्मक विचारसरणी यामुळेच ते प्रत्येक UPSC विद्यार्थ्याच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण करतात.

आणखी वाचा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Share This Article
मी सचिन राठोड आहे. मागील 6 महिन्यांपासून मी नेटवर्थ आणि सेलिब्रिटी बायोग्राफी या विषयांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण लेख लिहीत आहे. माझं लिखाण ZakkasNews.com या वेबसाइटवर नियमित प्रकाशित होतं. मी वेगवेगळ्या कलाकार, उद्योजक आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या आर्थिक स्थिती, यशोगाथा आणि वैयक्तिक जीवनाविषयी माहितीपूर्ण व वाचकांना आकर्षित करणारे लेख तयार करतो.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *