Oppo A5 5G भारतात लॉन्च, मिळणार MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर सह 50MP चा कॅमेरा आणि 6000mAh ची मोठी बॅटरी फक्त ₹15,499 मध्ये

Amol Pawar
4 Min Read
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

ओपोने भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो बजेट सेगमेंटमध्ये धमाका करणारा पर्याय ठरणार आहे. कारण या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची मोठी बॅटरी आणि 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही उत्कृष्ट दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ सहजपणे शूट करू शकता.

या स्मार्टफोनचं नाव Oppo A5 5G असं ठेवण्यात आलं असून, हा एक 5G सपोर्ट असलेला बजेट फोन आहे. याआधीही ओपोने Oppo A5 Pro 5G सारखे फोन बाजारात आणले होते, पण Oppo A5 5G ची खरी खासियत म्हणजे कमी किंमतीतही तुम्हाला स्पेसिफिकेशनच्या बाबतीत कुठलीही तडजोड करावी लागत नाही.

जर तुम्ही सध्या बजेटमध्ये एक दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर Oppo A5 5G तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कारण फक्त 15 हजार रुपयांमध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा, जबरदस्त बॅटरी बॅकअप आणि 5G टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन मिळतं आहे.

चला मग जाणून घेऊया ओप्पोच्या बाकी सगळ्या डिटेल्स बद्दल 

Oppo A5 5G ची किंमत किती आहे? जाणून घ्या दोन्ही वेरिएंट्सची डिटेल्स

Oppo A5 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि त्यानुसार याच्या दोन्ही मॉडेल्सच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. ओपोचा बेस व्हेरिएंट, जो 6GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो, त्याची किंमत ₹15,499 ठेवण्यात आली आहे. तर दुसरा व्हेरिएंट, जो 8GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो, त्याची किंमत ₹16,999 आहे.

हा फोन ओपोने दोन आकर्षक रंगांमध्ये सादर केला आहे – ग्रीन आणि मिस्ट व्हाइट. तुम्ही हा फोन जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजेच Amazon वरून किंवा जवळच्या रिटेल स्टोअरमधून सुद्धा खरेदी करू शकता.

यासोबतच तुम्हाला काही खास ऑफर्स सुद्धा पाहायला मिळतील – जसं की ₹1,500 चा इंस्टंट डिस्काउंट आणि 6 महिन्यांची No Cost EMI सुविधा, जी Amazon वर उपलब्ध असेल.

Oppo A5 5G चे स्पेसिफिकेशन्स – डिस्प्ले, बॅटरी आणि प्रोसेसरची संपूर्ण माहिती

Oppo A5 5G Launch india

Oppo A5 5G स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं, तर या फोनमध्ये 6.67 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे, जो 1604 × 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये 1000 nits चा पीक ब्राइटनेस दिला आहे, त्यामुळे तुम्ही सूर्यप्रकाशातसुद्धा स्क्रीन सहज वाचू शकता. डिस्प्लेचे संरक्षण Corning Gorilla Glass 7i ने करण्यात आलेलं आहे.

फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेला आहे, जो पॉवर बटनमध्येच इंटिग्रेटेड आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित ColorOS 15 वर चालतो.

परफॉर्मन्ससाठी यामध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आलेला आहे. फोन दोन स्टोरेज व्हेरियंट्समध्ये लॉन्च झाला आहे – 6GB आणि 8GB ची LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज. यामध्ये microSD कार्डसाठी स्लॉट सुद्धा दिला आहे, त्यामुळे तुम्ही स्टोरेज वाढवू शकता.

कॅमेराबाबत सांगायचं झालं, तर फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे – 50MP प्राइमरी कॅमेरा आणि 2MP मोनोक्रोम सेन्सर. तर सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो व्हिडिओ कॉलिंगसाठीही उपयुक्त आहे.

Oppo A5 5G मध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे, या फोनला IP65 रेटिंग मिळालेली आहे, त्यामुळे थोड्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून याचे संरक्षण होते

आणखी वाचा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Share This Article
Follow:
नमस्कार! मी अमोल पवार आहे आणि गेली 2 वर्षं टेक्नोलॉजी आणि मोबाईल जगताशी संबंधित लेख लिहित आहे. मी 360mobiles.co.in या वेबसाइटवर हिंदी भाषेत मोबाईल फोन, लेटेस्ट लॉन्च, आणि बेस्ट बजेट स्मार्टफोन्स यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. आता मी ZakkasNews.com या नव्या मराठी वेबसाइटच्या माध्यमातून, हीच माहिती मातृभाषेत – मराठीत देण्याचा प्रयत्न करत आहे.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *