जर तुम्ही सध्या नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट २५ हजार रुपयांपर्यंत असेल, तर Samsung Galaxy A55 5G हा फोन तुमच्यासाठी एक दमदार पर्याय ठरू शकतो. 32MP सेल्फी कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि Exynos प्रोसेसरसारख्या दमदार फीचर्ससह येणारा हा फोन सध्या Amazon India वर जबरदस्त सवलतीत मिळतोय. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या मॉडेलची लॉन्चिंग किंमत ₹39,999 होती, मात्र आता तो फक्त ₹25,999 मध्ये उपलब्ध आहे. यासोबतच ₹500 चा कूपन डिस्काउंटही आहे, म्हणजे तुम्ही हा फोन फक्त ₹25,499 मध्ये खरेदी करू शकता.
याशिवाय नो कॉस्ट EMI, फोन एक्सचेंजसारखे फायदेही मिळतात, जे खरेदीला आणखी फायदेशीर बनवतात.
सॅमसंग गॅलेक्सी A55 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगने Galaxy A55 हा फोन जरी मिड-रेंज सेगमेंटमध्ये लॉन्च केला असला, तरी त्यात मिळणारी स्पेसिफिकेशन्स प्रीमियम फोन्सना टक्कर देणारी आहेत. या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल HD+ Super AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी Corning Gorilla Glass Victus+ चा वापर करण्यात आला आहे.
फोनमध्ये Exynos 1480 प्रोसेसर दिला असून, तो 12GB रॅम आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह येतो. यामुळे मल्टीटास्किंग आणि परफॉर्मन्स एकदम स्मूथ राहतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 5MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. एलईडी फ्लॅश लाइट सपोर्टसह येणारा हा सेटअप विविध अँगलमधून उत्तम फोटोज क्लिक करू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला असून, व्हिडिओ कॉलिंगसाठीही तो उत्कृष्ट ठरतो.
Galaxy A55 मध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली असून, ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 14 वर आधारित One UI 6.1 या सॉफ्टवेअरवर काम करतो, जे सॅमसंगचा एक क्लीन आणि कस्टमायझेबल इंटरफेस आहे.