Samsung Galaxy M36 5G लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या कोणते फीचर्स आधीच झाले लीक!

Amol Pawar
4 Min Read
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

सॅमसंग लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन 5G स्मार्टफोन Galaxy M36 5G सादर करणार आहे. हा फोन मागील वर्षी लाँच झालेल्या Galaxy M35 चा अपग्रेड व्हर्जन असणार असून, बजेट कॅटेगरीमध्ये आकर्षक फीचर्ससह येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy M36 5G भारतात 27 जून रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाणार आहे. याची विक्री Amazon वरून केली जाईल, जिथे या फोनसाठी खास मायक्रोसाइटही लाईव्ह झाली आहे.

या मायक्रोसाइटवरून फोनच्या डिझाइन, कॅमेरा सेटअप आणि काही खास AI फीचर्सची झलक देखील समोर आली आहे. Galaxy M36 5G ची किंमत ₹20,000 च्या आत असेल, त्यामुळे जर तुम्ही नवीन आणि दमदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग, जाणून घेऊया या फोनबाबत सविस्तर माहिती.

कधी होणार Galaxy M36 5G भारतात लाँच?

Galaxy M36 5G भारतात २७ जून रोजी दुपारी १२ वाजता लॉन्च होणार आहे. या फोनबाबतची माहिती सॅमसंगने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. यासोबतच ऍमेझॉनवर या फोनसाठी एक खास पेज (मायक्रोसाइट) देखील सुरू करण्यात आले आहे, ज्यावरून स्पष्ट होते की Galaxy M36 5G फोन ऍमेझॉनवरून खरेदी करता येईल. हा फोन Serene Green, Velvet Black आणि Orange Haze या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल. कंपनीकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, यामध्ये प्रीमियम डिझाईनसह दमदार फीचर्स दिले जाणार आहेत.

भारतात Galaxy M36 5G ची किंमत किती असेल?

Galaxy M36 5G स्मार्टफोन अजून अधिकृतरित्या लाँच झालेला नाही, त्यामुळे त्याची नेमकी किंमत सांगणं सध्या थोडं कठीण आहे. मात्र, लिक्स आणि रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा फोन भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे

  • 6GB रॅम + 128GB स्टोरेज
  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज

अंदाजे किंमतीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹19,999 असू शकते, तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹21,999 असण्याची शक्यता आहे.

पण, लाँचवेळी ऑफर किंवा डिस्काउंट दिल्यास ही किंमत थोडीफार कमी-जास्त होऊ शकते.

Galaxy M36 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स?

Samsung Galaxy M36 5G फोनबद्दल कंपनीने अजून पूर्ण माहिती दिलेली नाही, पण Amazon वर दिसलेल्या टीझरमधून काही खास फीचर्स समोर आले आहेत. जसे की या फोनमध्ये Corning Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन दिलं आहे, जे स्क्रीनला खूप मजबूत बनवतं. कॅमेर्‍याबद्दल बोलायचं झालं तर, फोनच्या मागे तीन कॅमेरे दिलेले आहेत – 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा. तर, समोरच्या बाजूला 13MP सेल्फी कॅमेरा दिल आहे जो व्हिडिओ कॉलिंग आणि फोटोसाठी उपयुक्त आहे.

या मोबाईलमध्ये काही स्मार्ट AI फीचर्सही आहेत. जसे की Circle to Search फिचरमुळे स्क्रीनवर असलेला कुठलाही फोटो, मजकूर किंवा म्युझिकवर सर्कल करून थेट Google वर सर्च करता येईल. Google Gemini Live च्या मदतीने तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळू शकतात. तसेच, AI Select फिचरमुळे डॉक्युमेंट तयार करणे, फाईल्स व्यवस्थित लावणे किंवा इतर क्रिएटिव्ह कामं अगदी सोपं आणि जलद करता येणार आहे.

हे सर्व फीचर्स Galaxy M36 5G ला एक स्मार्ट आणि उपयोगी फोन बनवतात.

आणखी वाचा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Share This Article
Follow:
नमस्कार! मी अमोल पवार आहे आणि गेली 2 वर्षं टेक्नोलॉजी आणि मोबाईल जगताशी संबंधित लेख लिहित आहे. मी 360mobiles.co.in या वेबसाइटवर हिंदी भाषेत मोबाईल फोन, लेटेस्ट लॉन्च, आणि बेस्ट बजेट स्मार्टफोन्स यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. आता मी ZakkasNews.com या नव्या मराठी वेबसाइटच्या माध्यमातून, हीच माहिती मातृभाषेत – मराठीत देण्याचा प्रयत्न करत आहे.
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *