POCO F7 भारतात या दिवशी होणार लाँच , मिळणार जबरदस्त गेमिंग प्रोसेसर आणि मोठी बॅटरी

Amol Pawar
Amol Pawar
मी अमोल पवार आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून टेक्नॉलॉजी व ऑटो क्षेत्राशी संबंधित माहिती मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवतो. zakkasnews.com वर मी मोबाईल, बाईक, स्कूटर, नवीन लॉन्च व...
3 Min Read
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

भारतात लवकरच POCO चा एक नवा दमदार स्मार्टफोन लाँच होणार आहे, ज्याचं नाव असेल – POCO F7. कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत या फोनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. मिळालेल्या अपडेट्सनुसार, POCO F7 याच महिन्यात भारतात लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 7550mAh ची प्रचंड मोठी बॅटरी, 12GB रॅम, आणि दमदार परफॉर्मन्स मिळणार आहे. हा फोन सुमारे ₹30,000 ते ₹35,000 च्या बजेटमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. चला तर मग, जाणून घेऊया POCO F7 मध्ये काय खास आहे आणि याचे फीचर्स, किंमत, आणि लॉन्च डेटबद्दल संपूर्ण माहिती.

POCO F7 या दिवशी होणार भारतात लाँच

कंपनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, POCO चा नवा स्मार्टफोन POCO F7 भारतात 24 जून रोजी लाँच होणार आहे. टीझरमध्ये कंपनीने या फोनचं आकर्षक डिझाईन उघड केलं आहे, जे Redmi Turbo 4 Pro पेक्षा पूर्णपणे वेगळं दिसत आहे. रेडमीने Turbo 4 Pro आधीच चीनमध्ये सादर केला असून, POCO F7 त्याचाच ग्लोबल व्हर्जन मानला जातो. विशेष म्हणजे, डिझाईन वेगळं असलं तरी या दोन्ही फोन्समध्ये 12GB रॅम, 7550mAh बॅटरी, आणि दमदार प्रोसेसरसारखेच स्पेसिफिकेशन्स मिळतील, अशी माहिती टेक तज्ज्ञांनी दिली आहे.

POCO F7 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

POCO F7 हा स्मार्टफोन केवळ डिझाईनच्या बाबतीतच नव्हे, तर परफॉर्मन्स आणि बॅटरी लाइफमध्येही खूप काही नवीन घेऊन येतोय. आणि मिड-रेंज बजेटमध्ये फ्लॅगशिप लेव्हलचे फीचर्स देण्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये दमदार चिपसेटपासून ते मोठ्या बॅटरीपर्यंत सर्वकाही समाविष्ट असणार आहे, जे विशेषता गेमिंग आणि हेवी युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. चला तर मग, जाणून घेऊया या दमदार स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स:

🔹 डिस्प्ले:
सगळ्यात आधी डिस्प्ले बदल जर बोलायचे असेल तर POCO F7 मध्ये 6.83 -इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले मिळतो, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3200 nits ची पीक सपोर्टसह येतो.

🔹 प्रोसेसर:
या फोनमध्ये Snapdragon 8s Gen 4 चिपसेट दिला जाणार असून, हे चिपसेट 5G आणि गेमिंगसाठी अत्यंत पॉवरफुल मानलं जातं आहे.

🔹 रॅम आणि स्टोरेज:
12GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 4.0 इंटरनल स्टोरेज यामध्ये मिळणार आहे.

🔹 बॅटरी:
फोनमध्ये 7550mAh ची प्रचंड मोठी बॅटरी दिली गेली असून, ती 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्यामुळे फोन फक्त काही मिनिटांत फूल चार्ज होईल.

🔹 कॅमेरा:
POCO F7 फोन मध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर फ्रंटला 20 MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची सक्यता आहे.

🔹 ऑपरेटिंग सिस्टम:
हा फोन Android 15 वर आधारित HyperOS वर चालेल, जो अधिक स्मूथ आणि फिचर-रिच यूजर इंटरफेस देतो.

🔹 डिझाईन आणि बिल्ड:
POCO F7 चं डिझाईन Redmi Turbo 4 Pro पेक्षा वेगळं असून, इन-हँड फिल आणि लुक्स अधिक प्रीमियम वाटू शकते.

🔹 अपेक्षित किंमत:
भारतामध्ये या फोनची किंमत किती असणार आहे या बदल पोको ने अजून काही माहिती दिलेली नाही आहे पण जर अंदाजे सांगायचे असेल तर POCO F7 ची किमत ₹30,000 ते ₹35,000 दरम्यान असू शकते.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Share This Article
Follow:
मी अमोल पवार आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून टेक्नॉलॉजी व ऑटो क्षेत्राशी संबंधित माहिती मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवतो. zakkasnews.com वर मी मोबाईल, बाईक, स्कूटर, नवीन लॉन्च व ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी संबंधित बातम्या, रिव्ह्यू व तुलना सादर करतो. माझं उद्दिष्ट आहे – माहिती सरळ आणि उपयुक्त भाषेत देणं. 👉 माझ्याबद्दल अधिक जाणून घ्या
12 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *